
दि. कागल एज्युकेशन सोसायटीच्या वाय. डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,कागल मध्ये डी. फार्मसी. व बी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजित राजिगरे(संचालक, सार्थ आयुर्वेदा), श्री.बिपीन माने (महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष व कागल एज्युकेशन सोसायटीचे संचालक) आणि सौ.शिल्पा पाटील (संचालिका, वाय. डी.माने कॅम्पस) लाभले होते.
डिप्लोमा द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. आदिती पाटील हीने भरतनाट्यम सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली.
पाहुण्यांच्या हस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देवून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. अजित राजिगरे यांनी आयुर्वेदिक औषधांचे थोडक्यात महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
प्राचार्य डॉ. सचिन माळी यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. तसेच सौ. शिल्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
डिप्लोमा द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी काही मनोरंजक स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धांमधून जे जिंकलेले विद्यार्थी होते त्यांची प्रश्न मंजुषा घेण्यात आली व त्यामधून मिस फ्रेशर व मिस्टर फ्रेशर जाहीर करण्यात आले. मिस फ्रेशर कु.आरती पाटील व मिस्टर फ्रेशर कु. संकेत सावळे यांचा प्राचार्य डॉ. सचिन माळी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.