
दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय. डी. माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, कागल येथे
शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन प्राचार्य डॉ. सचिन माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर बी.फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या कीर्तीचे गुणगान यावर
कविता सादर केली.
तसेच विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर उत्कृष्ट व अविस्मरणीय व्याख्यान दिले.
डिप्लोमा प्रथम वर्षातील विद्यार्थिनींनी शिवजन्मोत्सव पाळणा यावर नृत्य सादर केले. डी.फार्मसी
प्रथम वर्षातील विद्यार्थ्याने लाठीकाठी, तलवारबाजी व दानपट्टा यांचे सादरीकरण केले.
बी.फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांवर आधारित पोवड्यावर नृत्य सादर केले .
शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे बुद्धीने, चातुर्यांने अफजलखानाचा वध केला होता याचे नाटक बी
. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर केले.
प्राचार्य डॉ. सचिन माळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम
यशस्वीरीत्या पार पडला.
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र