
दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय. डी. माने कॅम्पस, कागल येथे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून मटकरी हॉल येथे समारंभ आयोजित करण्यात आला होता
समारंभाचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री. प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष श्री. सुनील माने , संचालक व महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष श्री. बिपीन माने, वाय. डी. माने कॅम्पसच्या संचालिका सौ. शिल्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या विविध शाखेचे विभाग प्रमुख सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची महती सांगणारी पथनाट्ये, नृत्ये सादर केली.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले .