
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा”
वाय. डी. माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, कागल.
प्रस्तावना:
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कागल येथे १४ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात आला. या काळात ग्रंथप्रदर्शन, ‘लेखक-वाचक संवाद’ या विषयावर मा. मंदार राजाराम पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान तसेच कथाकथन, काव्यवाचन व निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या भाषिक कौशल्यांचे सादरीकरण केले. समारोप प्रसंगी विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी दैनंदिन व्यवहारात शुद्ध मराठी वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान व जाणीव वाढून ‘मराठी बोलूया, मराठी लिहूया’ हा संदेश प्रभावीपणे रुजविण्यात यश आले.
28 January 2026
“Reading Resolution Maharashtra”
Y. D. Mane Institute of Pharmacy, Kagal
Highlights:
As per the circular issued by the Government of Maharashtra, the “Marathi Language Fortnight” was enthusiastically celebrated at Y. D. Mane Institute of Pharmacy, Kagal from 14 to 28 January 2026. During this period, various activities such as a book exhibition, an inspiring lecture by Hon. Mandar Rajaram Patil on the topic “Author-Reader Interaction,” as well as storytelling, poetry reading, and essay writing competitions were organized.
Students participated enthusiastically and showcased their linguistic skills. During the valedictory function, the winners were felicitated. The dignitaries emphasized the importance of using pure Marathi in daily communication. Through this initiative, awareness and pride for the Marathi language increased among students, successfully instilling the message: “Let us speak Marathi, let us write Marathi.”




