दि. कागल एज्युकेशन सोसायटीच्या वाय.डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कागल येथे वार्षिक स्नेहसंमेलन (RHYTHM 2K22) उत्साहात पार पडला .

दि. २०/०५/२०२२ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माधुरी पवार या मराठी अभिनेत्री, अप्सरा आली या ‘झी युवा मराठी टिव्हीवरील कार्यक्रमामधील महाराष्ट्राची पहिली अप्सरा ,आणि तसेच तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठी मालिकेतील ‘नंदिता वहिनीं’ची भूमिका साकारणाऱ्या त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

👉🏻 माधुरी पवार यांचा सत्कार संस्थेचे संचालक व फार्मसी गव्हर्निंग कौन्सिल (महाविद्यालयीन समिती) चे अध्यक्ष श्री. बिपीन माने यांच्या  हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अधिष्ठाता सौ . शिल्पा पाटील, प्राचार्य. डॉ. सचिन माळी व  श्री. शंकर संकपाळ सर उपस्थित होते.

👉🏻तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, एकांकिका, फॅशन शो अशा विविध कला सादर केल्या.

👉🏻सर्व विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला.

👉🏻दि. १९/०५/२०२२ रोजी भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगत पारंपरिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशातील विविध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी या दिवसातून घडवले.

👉🏻गणेशोत्सव, पंढरीची वारी व दाक्षिणात्य लग्न समारंभ, असे विविध संस्कृतीचे महत्त्व सांगत यांसारख्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी या दिवसाचा आनंद लुटला.

👉🏻विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी फिशपॉंड्स आयोजित केले होते.

👉🏻कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने व संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांचे प्रोत्साहन लाभले.