वाय. डी. माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

 

दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय. डी. माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी कागल मध्ये शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कॉलेज चे प्राचार्य डॉ. सचिन माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

यानिमित्त निबंध स्पर्धेचे व छायाचित्र प्रदर्शन आयोजन करण्यात आले. बी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी गीत गायन व पोवाडा सादर केला.

सदर कार्यक्रमात प्राचार्यांनी विध्यार्थ्यांना कॉलेज जीवनातील नियोजन व व्यवस्थापन यावर संबोधीत केले.