लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा शंभरावा स्मृतिदिन

 

दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय. डी. माने इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कागल मध्ये *लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज* यांना कृतज्ञता व्यक्त करत शंभरावा स्मृतीशताब्दी सोहळा साजरा केला.

मानवी विकासाचे सर्वांगीण प्रतिमान तयार करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज शुक्रवार दि. ६ मे रोजी शंभरावा स्मृतिदिना निमित्ताने सकाळी दहा वाजता कॉलेजचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून, तसेच १०० विध्यार्थ्यानी शंभर च्या आकड्यामध्ये उभे राहून आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध करणाऱ्या या लोकराजाला त्यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त अभिवादन केले.

कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन माळी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या वेळी प्राध्‍यापिका सौ. योगिता कदम यांनी *लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज* यांचा जीवन कार्यकाल थोडक्यात संबोधीत केला.

 

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा शंभरावा स्मृतिदिन या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन माळी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत अहवाल सादर केला.