मानवतेसाठी योग” या थीम ला अनुसरुन वाय. डी. माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय. डी. माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी कागल मध्ये योगा दिवस साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्य महोत्सवी वर्षानिमित्त संपन्न होत असलेल्या या योग दिनाला विशेष महत्व असून ‘मानवतेसाठी योग, ही मुख्य थीम या वर्षीच्या कार्यक्रमाची आहे.

शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे, असे योगगुरू विठ्ठल कुंभार यांनी सांगितले. तसेच कपालभारती, प्राणायाम, सूर्यनमस्कार, असे विविध आसने त्यांनी घेतली.