YDMIP RHYTHM 2K22 पारितोषिक वितरण समारंभ
👉दि. कागल एज्युकेशन सोसायटीच्या वाय.डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कागलच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
👉प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जॉन आय. डिसूझा प्राचार्य तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी वारणानगर आणि दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. प्रताप (भैय्यासो) वाय. माने हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
👉दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे चे संचालक व फार्मसी गव्हर्निंग कौन्सिल (महाविद्यालयीन समिती) चे अध्यक्ष श्री. बिपीन वाय. माने, आणि माजी नगराध्यक्ष नवल बोते, पंचायत समितीचे सदस्य रमेश तोडकर व संस्थेच्या अधिष्ठाता सौ. शिल्पा जी. पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
👉सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
👉डिप्लोमा द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
👉कॉलेज चे प्राचार्य डॉ. सचिन एस. माळी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर श्री. प्रताप (भैय्यासो) वाय. माने यांनी पाहुण्यांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
👉प्राचार्य डॉ.सचिन एस.माळी यांनी इतर पाहुण्यांचा फुलांचे रोपटे देऊन सत्कार केला.
👉श्री. प्रताप (भैय्यासो) वाय. माने यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवाने विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
👉डॉ. जॉन आय. डिसूझा यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी शिक्षण, कौशल्य कसे विकसित करावे याबाबत मार्गदर्शन केले.
👉सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रीडा व इतर अभ्यासक्रमातील सर्व विजेत्यांना पारितोषिक, प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले.
👉प्राध्यापिका सौ. योगिता खोत यांनी मान्यवरांचे आभार मानले.